August 03, 2012

मोगरा फुलला

Mogara Phulala_Marathi Katha Blog














कथा ह्या माणसाच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक म्हंटला तर अतिशोयोक्ती होणार नाही, कदाचित.. कारण एक काळ होता, जेव्हा pocket - money  मधले पैसे वाचवून लायब्ररी लावायची आणि कथा- कादंबऱ्या पिजून काढायच्या. कधी पौराणिक, कधी सामाजिक, कधी suspense- thrill. ह्याच कथा आपल्याला घडवत असतात. कथा - कादंबरी मध्ये वाचलेले नायक, नायिका, इतर पात्र इतकच काय पण काही प्रसंग हि आपल्याला आपलेसे करणारा हा ललित साहित्याचा एक प्रकार आहे. मग अश्या कथा - कादंबरी ह्या ई - युगात कुठे ? असा प्रश्न आपल्याला सहज पडू शकतो. पण नाही, कांचन कराई ह्यांचा मोगरा फुलला हा ब्लॉग कथाप्रेमी वाचकांसाठी कथासंग्रह उपलब्ध करतो. 
ब्लॉगचे वैशिष्ठे -
  • 2008 साली सुरु झालेला हा ब्लॉग कराई ह्यांच्या कथालेखानानी सुसज्जित झाला आहे.
  • कथा- कादंबर्यांचा दर्जेदार ठेवा त्यांच्या ब्लोग मधील कथांतून दिसतो.
  • मोगरा फुलला वाचकांना विविध वर्गावारीतल्या कथांचे संग्रह उपलब्ध करून देतो. जसे,
      • कौटुंबिक आणि सामाजिक.
      • रहस्य आणि अद्भुतकथा.
      • भयकथा.
      • प्रेमकथा.
      • विनोदीकथा.
    • वेगवेगळ्या कथावर्गतील जवळजवळ 6 कथा ह्या ब्लोगद्वारा प्रदर्शित करण्यात आल्या आहेत.
    • ब्लॉग संकेतस्थळ काही कारणाने हलविण्यात आले आहे. तरी index लिंक वर click करून कथांची वर्गवारी दिसते.
    • कथांचे मुखपृष्ठ कथांना समर्पक असेच आहेत.
      ब्लॉग लेखक/ लेखिका - कांचन कराई.
      ब्लॉग अधिकृत URL - http://www.mogaraaphulalaa.com
      ब्लोग उत्तम असला तरी काही हलक्या त्रुटी अवश्य आहेत.
      •  ब्लॉग वर अपेक्षित links सापडण्यास अडचणी येऊ शकतात.
      • Archive मधील links ची व्यवस्था अजून उत्तम पद्धतीने होऊ शकते,  जेणे करून वाचकाला आपण कोणत्या कथेचा कितवा भाग वाचत आहोत हे सहज कळू शकते.  
      Out of 99% there should always remain 1% , because 1% always helps to reach the excellence.
      तरीही कांचन कराई ह्यांच्या लेखणीतून उतरलेल्या कथा वाचकांना भावनांचे मधुर सुगंध देत राहतील, हे नक्की.  त्यांच्या ह्या मोगरा फुलला ह्या उपक्रमाला शुभेछा.. 

        *हा ब्लॉग फक्त एक Review आहे. ब्लॉग लेखक/लेखिकेला संबंधित ब्लॉग वरील माहिती प्रदर्शित करायची नसल्यास कृपया Comment द्वारा सांगा, तो ब्लॉग Review हटवण्यात यईल.

      1 comment:

      1. नमस्कार, माझ्या ब्लॉगची समीक्षा केल्याची माहिती मला आज गुगल सर्च करता करता मिळाली. धन्यवाद. माझ्या ब्लॉगची लिंक http://mogaraaphulalaa.blogspot.com अशी जर आपण लेखामध्ये बदलून घेतलीत तर या पोस्टच्या वाचकांना योग्य लिंकवर जाऊन माझ्या कथा वाचता येतील.

        ReplyDelete